Posts

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चव्हाणवाडीत २५ युवकांचे रक्तदानातून अभिवादन ----------------------------------- *सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; रक्तदात्यांचा रेनकोट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव.* ------------------------------------------ इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथे डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यापैकी रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २५ युवकांनी रक्तदान करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अनोखे अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यसंपदा, सामाजिक विचार आणि वंचित समाजासाठीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुकरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. पांडुरंग चव्हाण व श्री. नागनाथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. गोविंद ...