अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चव्हाणवाडीत २५ युवकांचे रक्तदानातून अभिवादन
-----------------------------------
*सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; रक्तदात्यांचा रेनकोट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव.*
------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथे डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यापैकी रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २५ युवकांनी रक्तदान करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अनोखे अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यसंपदा, सामाजिक विचार आणि वंचित समाजासाठीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुकरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. पांडुरंग चव्हाण व श्री. नागनाथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. गोविंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पै. बंडोपंत चव्हाण, उपसरपंच श्री. प्रकाश चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. कृष्णात चव्हाण, पोलीस पाटील श्री. शत्रुघ्न चव्हाण, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री. यशवंत चव्हाण, कट्टर शिवसैनिक श्री. शिवाजी सापते, युवा नेते श्री. हनुमंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. सूरज चव्हाण, ज्येष्ठ नागरिक श्री. अनिल प्रभू चव्हाण, श्री. अविनाश चव्हाण, श्री. गणेश शामकर्ण चव्हाण, श्री. श्रीकांत सुरडे व श्री. विठ्ठल नवगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सोलापूर येथील शिवशंभो ब्लड बँकेचे डॉ. चेतन सावनूर व डॉ. अमीर मुजावर यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. शिबिरात २५ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली. सर्व रक्तदात्यांचा मंडळाच्या वतीने रेनकोट व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिश पारधे, ओमकार बोराडे, तुकाराम पारधे (अध्यक्ष), महेश पारधे (उपाध्यक्ष), सज्जन पारधे, सोमनाथ बोराडे, अभिषेक पारधे, निलेश पारधे, दीपक पारधे आणि एकनाथ पारधे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चव्हाणवाडीतील युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
Comments
Post a Comment